माझे मन म्हणाले मला...
हल्ली तू माझे ऐकत नाहीस...
तुझ्या बुद्धी पुढे माझे काही चालत नाही...
पहिल्यांदा तू माझे ऐकायचास...
माझ्यासाठी आईचे धपाटे खायचास...
आता तू मोठा झालास...
आणि मला विसरलास...
बुद्धी स्त्रीलिंगी आहे...
म्हणून निसर्गाच्या नियमानुसार...
माझ्यापेक्षा आता तुला ती मोठी आहे...
No comments:
Post a Comment