Tuesday, 26 April 2011

मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

सगळ्या मुली अश्या नसतात हे अगोदरच मान्य करून....

मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

अरे या मुलीच मुलांना मागे लावतात...
अंगावर तोकडे कपडे घालतात..
ओठाणवर लाल भडक लिपस्टिक लावतात..
थोबाडावर पीठसारखी पावडर थापतात...
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

मुलींवर अत्याच्यार होतो म्हणतात...
मग..अत्याच्यर वायला ह्या कोपच्यात का जातात...??

सगळ्या गोष्टीना मुलांना जबाबदार धरतात...
मग मुलांना तसे करायला उत्तेजित का करतात...??

एकीकडे स्त्री पुरूष समानता कायदा मागतात...
मग नोकर्‍यांमधे 50% आरक्षण का मागतात...??

मुलांच्याच पैशात सिनेमा बघतात...
खा खा खातात..पी पी पितात...
बिल मात्र मुलांच्याच गळ्यात मारतात...
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

अरे या मुलीच चावट असतात...
पैसेवाला मुलगा बघून टाइमपास करतात...
एकाकडचे पैसे संपले की दुसरा पकडतात
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात..??

Thursday, 21 April 2011

सूर्यफुल...

सूर्यफुल...

रोज ते सूर्यफुल सूर्याकडे बघायचे..
सूर्यासोबत आपली दिशा बदलायचे...

काळ्या ढगात सूर्य लपला..
की ते पण रूसायाचे..

सूर्याकडे बघून सगळेच डोळे मिटतात..
पण सूर्यफुल नजरेला नजर द्यायचे..
सूर्याची कीराणे अंगावर झेलायचे..
आणि सुखद भावनानी..फुलायचे...

एक दिवस सुर्या उगवला...
पण त्याला सूर्यफुल नाही दिसले..
सूर्याच्या किरणानी पण फुलला शोधले....

शेताताले ते सूर्यफुल नेले होते माणसाने...
तेलाच्या घाण्यात...तेल बनवण्यासाठी...
सूर्य मात्र रडत होता त्या फुलासाठी....

सॉरी मित्रानू...

सॉरी मित्रानू...
काही दिवस आणि काही करणं मुळे फसेबूक सोडाव लागतय...
तुमच्या सारख्या मित्रणा दूर लोटाव लागतय...

सॉरी मित्रानू...
"आम्ही मालवणी" ची खूप सवय झालीय...
सवय सोडून जगणे..अगदी जिवावर आलाय...

सॉरी मित्रानू...
सकाळी चहा पिताना, दुपार-रात्री जेवताना...
तुमका बोलावल्याशिवाय जेवायचाय नाय...

सॉरी मित्रानू...
उद्यापासून तुमका बोलावचय नाय...
उठलास काय, जेवलास काय इचारूचय नाय...

सॉरी मित्रानू...
माझा फेक्बूक सोडून जाणा मनावर नको घेव...
सांगून जाताय...लवकरच भेटान 'बाय!!!!'...

सॉरी मित्रानू...

माझे मन

माझे मन म्हणाले मला...
हल्ली तू माझे ऐकत नाहीस...
तुझ्या बुद्धी पुढे माझे काही चालत नाही...

पहिल्यांदा तू माझे ऐकायचास...
माझ्यासाठी आईचे धपाटे खायचास...

आता तू मोठा झालास...
आणि मला विसरलास...
बुद्धी स्त्रीलिंगी आहे...
म्हणून निसर्गाच्या नियमानुसार...
माझ्यापेक्षा आता तुला ती मोठी आहे...

Tuesday, 19 April 2011

"जैतापूर प्रकल्प"

"जैतापूर प्रकल्प" हे शब्द एका वृद्ध महिलेच्या कानावर पडले.
तिच्या मनात काय विचार आले असतील ते मांडण्याचा एक प्रयत्न...

अरेय ह्या काय चालला हा...
माका कोणी सांगात काय....

कसलो ह्यो अणूउर्जा प्रकल्प...
माका पण काळात काय....

कसलो विरोध...आणि कसले सभा..
कोकणाशिवाय काय खय नाय जागा....


काल झालो बेधुन्द गोळीबार..
तेच्यात शहीद झालो आमचो एक पोर...

नको रे करू प्रकल्पाचा राजकारण....
नको आणूस आमच्यार उपासमारिचा मरण....

शेतीची जागा प्रकल्पक दिलाव...
तर आम्ही काय खातलव....
आणि कशे जगतलव...

Thursday, 14 April 2011

"जय भीम"

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल...

"जय भीम"

तुम्हाला माझे मनापासून मानवंदन..
तुम्ही समाजाला उत्क्रान्त करणारा दीपस्तम्भ...
भारताची राज्यघटना लिहिणारे भारतरत्न...
समाजाला अभ्यासायला लावणारा तुमचा बुद्धान विषयीचा दृष्टिकोन...
अभ्यासले तुम्ही ऋग्वेद आणि इतर बरेच धर्म..
शोधूनी काढीला क्षुद्र हा चौथा वर्ण...
क्षुद्र समाजाला जगण्या साठीचे तुमचे प्रयत्न...
आणि त्याला जतीनुसार आरक्षण...
पण त्या आरक्षणवर सध्या खेळले जातेय राजकारण...
घटनेत बदल व्हायला करावे लागेल उपोषण...
या समाजाला आर्यांची आणि बुद्धांची परत द्या शिकवण...
आजही तुमची आम्हाला येतेय आठवण..
म्हणून म्हणतो तुम्ही परत घ्या जन्म...परत घ्या जन्म...

--------------सचिन आचरेकर

Wednesday, 13 April 2011

गर्लफ्रेंड...

गर्लफ्रेंड By Sachin Acharekar

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
पन छाती धड़धड़ाइची..पाउले तितेच थाम्बयची...
जीभ थरथरयची आनी वेगळेच बोलुन जाइल तर भिति वाटायची....

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
पन तिच्या भावनाना दुखवायचे नवहते मला..
प्रेमासाथी मैत्री तोड़ायची नव्हति मला...

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
होकर किवा नकार खिलादूपने स्वीकारायचे ठरवले...
असच आपल मनातले मनापसुन सानगायचे ठरवले..

मी विचारले माझी गर्लफ्रेंड होशील??
ती म्हनालि. आज आसा का विचार तोस?
मी तर तुझी गर्लफ्रेंड कधि पासुनच आहे...

मी पन विचारले कधिपसुन??
ती म्हनालि...जेव्हा आपली फ्रेंडशिप झाली तेव्हपसुन..

मला वाटले...........
ती पन असच अपला मानताले आज माला सान्ग्तेय..
ती म्हनालि. माझ लग्न ठरलेय राजू शी..
तू येशिल ना नक्की...
तू एकच माझा Boyfriend आहेस बाकी सगळे Girlfriends आहेत...

मी पन आश्चर्याने विचारले...
किति गर्लफ्रेंड्स आहेत तुला??...
ती म्हनालि..
मैत्रीणी खूप आहेत रे मला...
पन मित्र तू एकटाच आहेस..

----- सचिन आचारेकर

"त्रेतायुग - कलियुग"

रामनवमी स्पेशल by सचिन आचरेकर

"त्रेतायुग - कलियुग"

त्या वेळचो काळ एगलो होतो नाय....
एकापेक्षा जास्त बायका करुक परवानगी होती..
पण प्रभू राम एकपात्नि रवले..

आणि आत्ताच्या काळात..
एकपात्नि चो कायदो असताना...
घरवाली असली तरी बाहरवाली होई असता...

सीता लंकेत रामाच्या नामस्मरणाने निर्धारान रवलि..
वनवासात रामासोबत येवचो हट्ट धरल्याण...
पातीविरह पेक्षा प्राणत्याग स्वीकारूचो ठरायल्याण....

आणि आत्ताच्या काळात...
नवरो गेलो तारवर आणि बायको रवली गुरुवार!!!!!!

पापी वालीचो वध करून..
"किशिंधा कोसळ" आपल्या देशाक न जोडता..
वानर राज शुद्रिवलाच अभिषिक्त केलात...

आणि आत्ताच्या काळात...
मुंबई महाराष्ट्राची की भारताची हेच्यार भांडणा होतात...

कैकेईच्या वरानुसार 14 वर्षे वनवास सोसलत...
भरतान पण तुमचे पदुका सिंहासनावर पुजून..
तुमचो प्रतिनिधी म्हणून राज्य केल्यान...
बंधू प्रेम आणि आई वडिलांची आज्ञा तुम्ही पाळलात.

आणि आत्ताच्या काळात...
आई वडिलांच्या सम्पति वरच्या हिस्शासाठी भावा भावात कोर्टात केशी चालतत.

रावणाचो वध करून फक्त सिते क प्राप्त करून घेतलास...
लंकेच्या राज पदी भीभिषानाकच बसयलात...
दुसर्‍याची भुमी, दुसर्‍याची सत्ता, समर्थ्या असताना पण नकारलात...

आणि आत्ताच्या काळात...
काश्मीर साठी हिंसाचार आणि लढाये घडतात...

राम तुमचो जन्मदिवस आम्ही रामनवमी म्हणून साजारो करतव....
पण तुमचो आदर्श घेवण आमच्या अंतरी रामजन्म घेवक मात्र आम्ही इसारतव...

-सचिन आचरेकर

Friday, 8 April 2011

मित्राबद्दल झालेलो गैरसमज

ही कविता माझ्या एका खास मित्राच्या जीवनाशी निगडीत आसा आणि माझो मित्राबद्दल झालेलो गैरसमज मी मांडूचो प्रयत्न
करतय...


मी माझ्या मित्राला याहू वरती मेल पाठवायचो...
लगेच त्याचा आलेला रिप्लाइ पाहून मी पण सुखवायचो...


[थोड्याच दिवसात......]
मी मेल्स करतच होतो...
पण रिप्लाइ काही येत नव्हता...

काय झालेय ते काही कळेना...
कॉंटॅक्ट करायला मोबाइल पण लागेना...

त्याच्या अशा वागण्याने माझे मन दुखावले होते...
समोर आला की जाब विचारायचे असे मी ठरवले होते...

असाच तो एक वर्षानंतर..फसेबूक वर भेटला...
मी विचारले काय रे मेल्स ना रिप्लाइ देत नाहीस...तू मला विसरला...

त्याचा रिप्लाइ आला...
मी याहू मेल्स ओपन केले की डोळ्यात पाणी येते...
मी मार्मिकपणे विचारले..याहू वर कापून ठेवलेयत का कांदे...

तो म्हणाला..
याहू च्या मेलबॉक्स मधे तिचे मेल्स आहेत..
ती सोडून गेली मला..ब्रेकअप करून..
तिचे नाव दिसले की तिच्या आठवणीने मन जाते भरून...

हे वाचून माझे पण मन गेले भरून...
मी अलगतच आसु पुसले स्वतःला सावरून...

---------------- सचिन आचरेकर

अण्णा स्पेशल....

अण्णा स्पेशल....

अण्णा तुमचो जयजयकार...
तुम्हीच दिलास आमका माहितीचो अधिकार...
मुळापासून निपटून काढूचो भ्रष्टाचार...
ह्यो तुमचो निर्धार...
तेच्यासाठी चालू केलास परत उपासमार..
तुम्ही कसलोच करू नको विचार...
तुमच्या पायावर लोळान घालतला...
ह्या आपला सरकार...
माझो तुमका सास्ष्टान्ग नमस्कार...

जय हिंद -- सचिन आचरेकर

वस्त्रहरण ......

वस्त्रहरण ..............

तिला फक्त प्रसिद्धी हवी होती...
त्यासाठी वर्ल्ड कप ची फाइनल याच्यापेक्षा दुसरी संधी कोणती होती...

केले तिने ऐलान..विवस्त्र होऊन मैदानाला फेरी मारण्याचे...
मीडीयाला मिळाला एक प्रॉजेक्ट..काहीतरी नवीन दाखवायचे...

जिला मूठभर लोका ओळखत होती...तिला दुनिया ओळखू लागली..
प्रसिद्धी साठी तिने प्रतिष्ठा चव्हात्या वर आणली...

द्रौपदीच्या दरबारातील वस्त्राहारणाने महाभारताचा इतिहास घडला..
28 वर्षा नंतर वर्ल्डकप चा पुन्हा इतिहास घडवण्यासाठी तिने वस्त्रहरनाचा मार्ग निवडला...

या देशात दुष्यासनाशिवाय तिला वस्त्राहारण करण्याची कुठून प्रेरणा मिळाली...
प्रसिद्ध व्हायच्या वेडात ती भारतीय संस्कृतीची अब्रू काढून गेली...

-------------------सचिन आचरेकर

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
जन्माला आली तेव्हा पासून लाडकी झाली...


शाळेत असताना पालक सभेला तिला बापच लागायचा...
बाप पण वेळात वेळ काढून हजर राहायचा...


बापाचे आवडताते उकडीचे मोदक आवरजुन बनवायची...
रोज सकाळी उठल्यावर न चुकता चहा बनवून द्यायची..

तिच्या आवडी निवडी बाप पण जपायचा..
तिचे हट्ट पुरवण्यासाठी वेगळे पैसे साठवायचा...
आपली मुलगी म्हणजे त्याला हृदयाचा तुकडा वाटायचा...


मुलगी आता मोठी झाली दुसर्‍याच्या घरी जाणार..
शोधनार मी तिच्यासाठी सुंदर राजकुमार...
असे सारखे म्हणायचा....


मुलगी मात्र आपले हृदय एका पर जातीतल्या गरीब मुलाला देऊन बसली होती...
बाबाना कसे सांगायचे या विचाराने ती खचली होती...

न सांगताच ती एक दिवस त्याच्या सोबत पळून गेली..
जाताना मात्र बपाच्या हृदयात ठिणगी पेटवून गेली.

आपला हृदयाचा तुकडा आपल्याला दुखवून गेला...
हे समजल्यावर त्याला हृदय विकराचा झटका आला...
दवाखान्यात नेताना वाटेतच तो जग सोडून गेला...

एकदा जरी तिने आपल्या मनातले सांगितले असते...
बापाने आनंदाने तिचे लग्न करून दिले असते...
कारण तिच्या सुखाशिवाय त्यालाही दुसरे काय हवे होते...

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
बपाच्या प्रेमाची जागा त्याने कधी घेतली कळलच नाही...

------------------सचिन आचरेकर

Friday, 1 April 2011

भारत X पाकिस्तान

भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना...

काश्मीर चा वाद मिटवण्यासाठी..
भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना खेळवावा...
जो जिंकेल त्याचे काश्मीर..

जवानांच्या आयुष्याशी खेळण्यापेक्षा..
क्रिकेट खेळलेले काय वाईट ???
-- सचिन आचरेकर

वर्ल्ड कप स्पेशल....

वर्ल्ड कप स्पेशल....

भारताने पाकिस्तानला धूळ चारली..
सगळ्या भारतात दिवाळी साजरी झाली..

मोहालीची पुनरावृत्ती मुंबईत होऊदे..
आफ्रिदी सारखे संगकाराला पण खाली हात जाउदे..

सचिनला भारत रत्न कधीही मिळूदे..
वर्ल्ड कप च्या स्वरुपात भारताला रत्न मिळूदे..

सचिन चे महशतक त्याच्याच जन्मभुमीत झळकुदे..
९६ च्या सेमी फाइनल चा वचपा निघुदे...


भारतीयांच्या डोळ्यान आनंदाश्रु वाहूदे..
पुन्हा एकदा भारतात दिवाळी साजरी होऊदे..


पुन्हा एकदा घडवा 1983 चा इतिहास ...
तमाम भारतीयांच्या मनात एकच ध्यास...

वर्ड कप वर भारताचा हक़क़ ही आमची इछा..
फाइनल साठी भारतीया संघाला मालवणी शुभेच्छा.

------सचिन आचरेकर