"जैतापूर प्रकल्प" हे शब्द एका वृद्ध महिलेच्या कानावर पडले.
तिच्या मनात काय विचार आले असतील ते मांडण्याचा एक प्रयत्न...
अरेय ह्या काय चालला हा...
माका कोणी सांगात काय....
कसलो ह्यो अणूउर्जा प्रकल्प...
माका पण काळात काय....
कसलो विरोध...आणि कसले सभा..
कोकणाशिवाय काय खय नाय जागा....
काल झालो बेधुन्द गोळीबार..
तेच्यात शहीद झालो आमचो एक पोर...
नको रे करू प्रकल्पाचा राजकारण....
नको आणूस आमच्यार उपासमारिचा मरण....
शेतीची जागा प्रकल्पक दिलाव...
तर आम्ही काय खातलव....
आणि कशे जगतलव...
No comments:
Post a Comment