Wednesday, 13 April 2011

"त्रेतायुग - कलियुग"

रामनवमी स्पेशल by सचिन आचरेकर

"त्रेतायुग - कलियुग"

त्या वेळचो काळ एगलो होतो नाय....
एकापेक्षा जास्त बायका करुक परवानगी होती..
पण प्रभू राम एकपात्नि रवले..

आणि आत्ताच्या काळात..
एकपात्नि चो कायदो असताना...
घरवाली असली तरी बाहरवाली होई असता...

सीता लंकेत रामाच्या नामस्मरणाने निर्धारान रवलि..
वनवासात रामासोबत येवचो हट्ट धरल्याण...
पातीविरह पेक्षा प्राणत्याग स्वीकारूचो ठरायल्याण....

आणि आत्ताच्या काळात...
नवरो गेलो तारवर आणि बायको रवली गुरुवार!!!!!!

पापी वालीचो वध करून..
"किशिंधा कोसळ" आपल्या देशाक न जोडता..
वानर राज शुद्रिवलाच अभिषिक्त केलात...

आणि आत्ताच्या काळात...
मुंबई महाराष्ट्राची की भारताची हेच्यार भांडणा होतात...

कैकेईच्या वरानुसार 14 वर्षे वनवास सोसलत...
भरतान पण तुमचे पदुका सिंहासनावर पुजून..
तुमचो प्रतिनिधी म्हणून राज्य केल्यान...
बंधू प्रेम आणि आई वडिलांची आज्ञा तुम्ही पाळलात.

आणि आत्ताच्या काळात...
आई वडिलांच्या सम्पति वरच्या हिस्शासाठी भावा भावात कोर्टात केशी चालतत.

रावणाचो वध करून फक्त सिते क प्राप्त करून घेतलास...
लंकेच्या राज पदी भीभिषानाकच बसयलात...
दुसर्‍याची भुमी, दुसर्‍याची सत्ता, समर्थ्या असताना पण नकारलात...

आणि आत्ताच्या काळात...
काश्मीर साठी हिंसाचार आणि लढाये घडतात...

राम तुमचो जन्मदिवस आम्ही रामनवमी म्हणून साजारो करतव....
पण तुमचो आदर्श घेवण आमच्या अंतरी रामजन्म घेवक मात्र आम्ही इसारतव...

-सचिन आचरेकर

No comments:

Post a Comment