Thursday, 31 March 2011

नियती...

सकाळी उठल्यापासून तो एप्रिल फूल करी होतो...
आवस, बापूस, आजी, बहीण सगळ्याणका फसय होतो...

आवाशीन रागताच म्हटल्याण..जा मेल्या मर जा..खयतरि..
सतव नकोस माका..
जेवण करूचा रवला हा...दुपार झाली तरी..

मित्रंका एप्रिल फूल करुक बाइक वरसून स्वारी निघाली...
तो मित्रांकडे पोचाच आधीच तेंच्या कानावर बातमी पडली...
कोणीतरी एप्रिल फूल करता हा अशी मनात शंका इली...
गावभर तीच चर्चा सुरू झाली...

आवशी-बापाशिक सांगुची कोणाक हिंमत होय नाय...
कायटरी गावात अघटित घडला हा.. असा तेंका वाटला...

संध्याकाळी पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेली बॉडी घेवन अंमब्यूलेन्स इली...
तेचा तोंड बघून...आवशीच्या हृदयात धडकीच भरली....

एप्रिल फूल असो सत्यात उतरात असा कोणाक वाटलेला नाय...
सकाळी आवाशीन रागन बोललेले शब्द नियतीन खरे करूचे सोडल्यान नाय

---सचिन आचरेकर

No comments:

Post a Comment