Monday, 28 March 2011

तो.....

तो.....

तो आमच्या समोर राहायचा...
सारखा खिडकीतून मला बघायचा...
माझ्यावर प्रेम करायचा....
की नुसताच टाइमपास करायचा...

एक दिवस त्याने मला रस्त्यात गाठले....
माझ्या मनाने पण मानातच हसले.

घरातल्याना दुखवू की त्याला दुखवू.
मला काही कळेनासे झाले..
माझ्या मनाने शेवटी त्यालाच दुखावले..
माझे लग्न ठरलेय असे मी पकवले..

मला सांगायचा...
धुणी, भांडी आणि जेवण...
मी तुझ्यासाठी सगळे काही करीन...
तुला खूप सुखात ठेवीन..

अगदी वेड्या सारखा वागायचा...
दुःखी गाणी लावायचा...
येता जाता मलाच बघत बसायचा...
किती समजवले तरी परत मागे मागे यायचा...

तो खरच वेडा होता...
की..मी त्याला वेडावले होते...

का कोण जाणे आज तो घर सोडून जाताना..
माझ्याही डोळ्यात अश्रू होते.

---सचिन आचरेकर.

No comments:

Post a Comment