Tuesday, 6 December 2011

माझं घर

एक एक वीट रचुनी घर मी बांधिले...
कुठून आले वादळ कुणास ठावूक...
एवढे मोठे घर कोसळताना मी पहिले...
कसा सावरू मी स्वतःला..हेच मला कळेनासे झाले..


विस्कटलेली एक एक वीट शोधतोय...
पण नवीन रचलेली वीट कोसळतेय...
विटा मजबूत रचायला कुठे कमी पडतोय...
हेच मला कळेनासे झालेय...

मला वाटत त्रुटी त्या विटांमध्ये नाही.
त्रुटी माझ्या कर्तव्यात राहिली...
तुटलेले घर बांधायला मी का कमी पडतोय..
हेच मला कळेनासे झालेय...

जुन्या विटा लवकरच सापडतील
नवीन विटाना साथ देतील..
आपले घर परत उभे राहील...
अगदी पाहिल्यासारखे....

सचिन आचरेकर

तुझा विरह...

फेसबुक वर तिची ओळख झाली
तिचा ऑफिसमधला रिकामा वेळ ती माझ्याशी chat करून घालवू लागली..
मी मात्र वेड्यासारखा माझं काम बाजूला ठेवून तिच्याशी गप्पा मारायला लागलो..
कधी reply नाही दिला तर बोलायची....तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही....
आणि सारखं piing करत रहायची...
मला वाटायचे ...माझी किती काळजी करते...माझ्यासाठी online येते..

बोलता बोलता..तिच्यावर मन कधी जडले कळलच नाही..
एकदा ती मला म्हणाली...मला एक मुलगा आवडतो...सांग मी काय करू?...
तो मुलगा मी नसणारच हे मनाला माहित होत...
असंख्य विचार मनामध्ये घोळू लागले..
ना कामात लक्ष ना जेवणावर....
ना कोणाशी बोलावेसे वाटत होते...
कोणी online बोलायला आले तर busy आहे अस सांगून शांत बसायचो..
विचार केला...एकदा मनातले सांगून मोकळे व्हायचे...
पण मनातला ऐकून ती मैत्री तर नाही तोडणार ना....
आणि ती नाही बोलली तर माझं दिवस कसा जायील...
असंख्य विचार.....आणि मनाची कासावीस..
पण एकदा तिला सांगूनच टाकले...
अपेक्षेप्रमाणे तिचा नकार आला.....
आता ती मला ignore करतेय...
माझ्याशी बोलणे म्हणजे डोकेदुखी झालीय...
पण मला तिच्यासोबत बोलल्याशिवाय चैन पडत नाही...
ती बोलली..असा कसा विचार करू शकतेस तू...मला फक्त मित्र हवाय...
मी बोललो तुला मित्र हवाय मग आयुष्य भारासाठी का नको...
ती म्हणे सगळ्यांशीच चांगली बोलते आणि सगळेच तिच्या प्रेमात पडतात....
पण असा का वागते...कि ज्याच्यामुळे एखाद्याला सवय होते..इतक्या जवळ का जाते?
कि दूर जाताना त्रास देवून जाते...
मी शांत आहे समजून घेयीन...पण..
माझ्यासारखा एखादा प्रेमवेडा असेल तो कदाचित आपले आयुष्य संपवेल...
तुझ्या विरहाने......

सचिन आचरेकर
06/12/2011

Monday, 5 December 2011

एक चिमणी...

एक चिमणी पिंजऱ्यात बंधिस्त
पिंजरा हेच आपला माहेर आणि सासर समजलेली..
एक चिमणा..रोज तिच्या पिंजर्यासमोर घिरट्या घालणारा..
तिच्या आयुष्याकडे केविलवाण्या नजरेने बघणारा..
रोज तो यायचा...चिमणी पण हर्षाने बघायची..
तो आला... कि चिव चिव करायची...
तो चिमणा स्वच्छंद पणे विहार करायला विसरला...
सगळे सोबती फिरून दाने टिपून घरट्यात परतायचे..
तो मात्र एकाकी...काहीच न खाता परतायचा...

एके दिवशी बोलला तो चिमणीला..
चल माझ्यासोबत...सगळा जग फिरुया...
दोघे मिळून आपल्या घरट्यात राहूया
तुझ्या सोबतीने मला पण विहार करायचाय...

चिमणी बोलली..नाही रे..माझ्या पंखात आता बळ नाही...
माझ्या असण्याने ..इथली लोक बघ किती खुश राहतात..
त्यांच्या ख़ुशी साठी मला असाच रहायचय..

तू आजपासून इथे येवू नकोस...मला विसरून जा..
चिमणी ने स्वतःला strong समजलं..
तो चिमणा दुसऱ्यादिवशी नाही परतला.....
चिमणी विसरून गेली...असेल कुठेतरी खुश या विचाराने...
पण तो चिमणा तिला विसरू शकत नव्हता....
आणि परत पिंज्र्याकडे जावून चिमणीला त्रास होयील म्हणून जात नव्हता..

चीमाण्याने अन्न पाणी काहीच घेतले नाही..
घरट्यातून बाहेर देखील पडला नाही..
आयुष्य जगावे असा त्याला वाटले नाही...
त्यामुळे तो ४ दिवसातच मारून गेला...
इथे चिमणी मात्र खुश होती....
त्या चिमण्याला कोणीतरी दुसरी चिमणी मिळाली असेल या विचाराने...

सचिन आचरेकर.
05-12-2011

Friday, 21 October 2011

मालवणची दिवाळी

इली इली माझ्या घरी इली दिवाळी . ...
फाटफटी उठान धक्क्यार जातलाय ..
जाळूक नरकासुराची होळी ....

घराकडे येवन ....उटणा लावन न्हातलय ....
ओल्या अंगान....कारीट फोडून ....
गोयांदा ...गोयांदा आरडतलय

आवशीन बनयलेलो आणि शकल्याकद्सून इलेलो
फराळ खातालय.......
आजयेन बनयलेले गोड ओले - पोहे रगडतालय

चावदिसा दिवशी चावत रवतलय ...
लाडू , करंजे , चकली आणि शंकरपाळी ...
व्हाळावर धावाचा टाळूसाठी घेतलाय हजामोलाची गोळी ...

पाडव्याच्या दिवशी निघता रामेश्वराची पालखी .
मुलांनी बनवलेले किल्ले बघुक जातव आम्ही सगळे सोबती ...

चार दिवस वाऱ्यावर झुलतलो कंदील
आणि दारावर फुलाताला तोराण .
दिवे जळतले आणि रांगोळीने खुलतला
दारासामोराचा अंगण...

इली इली माझ्या घरी इली दिवाळी . ...
साजरी करुक चाललाय मी उद्या संध्याकाळी.....

सचिन आचरेकर

Thursday, 20 October 2011

समाज ..........

समाज ..........
हाच तो समाज ....

मुलाच्या आणि मुलीच्या मैत्रीला ...
लफड्याचे स्वरूप देणारा .....
... हाच तो समाज ....

मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा करून
मुलींची छेड काढणारा ...
हाच तो समाज

जातीयवाद , धर्मियता , चालीरीती, रूढी परंपरा जपण्याच्या नावावर ....
एखाद्या पिदिताचे शोषण करणारा ....
हाच तो समाज

आत्महत्या करणे हा गुन्हा आहे अस सांगणारा
आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारा ....
हाच तो समाज

जातीनुसार आरक्षणला विरोध करणारा
आणि लग्न जुळवताना पहिली जात विचारणारा
हाच तो समाज

कंटाळा आलाय या समजाचा ....
इछेप्रमाणे जगूही देत नाही...
आणि इछेनुसार मरूही देत नाही ....

पण.........

समाजाला बदलायचे असेल तर
पहिले बदलायला हवे स्वतःला .....
कारण स्वतः कडूनच सुरु होतो तो ...
हाच तो समाज .

सचिन आचरेकर

"आम्ही मालवणी" - टि-शर्ट

कृपया तुमचा नाव, टि-शर्ट सायीझ आणि टि-शर्ट ची संख्या खालील पैकी एका नंबरवरती sms करण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:

समीर गावडे: ९८९२३२७५९९ (Central)
रोशन हिंदळेकर: ९७०२७१०१७९ (Central)
महेश पराडकर: ९८३३८३९८०९ (South Mumbai)
राजन बागवे: ९९८७२२४५१६ (Western mumbai)

टि-शर्ट संबंधी माहिती:
रंग: प्लेन काळा
कॉलर: chinese with grey -whitish border
कापड: smooth nylon निवडलाय म्हणजे लोगो व्यवस्थित दिसेल आणि धुतल्यानंतर रंग जायचा प्रश्न नाही. आणि टि-शर्ट ताणणार नाही.
पुढील बाजू : आम्ही मालवणीचा open लोगो A4 size मधे (चित्रा सारखा दिसेल आणि लोगो चा patch चीकाताव्ल्यासारखा वाटणार नाही.)
पाठीमागची बाजू: "आम्ही मालवणी" हे दोन शब्द आकर्षक font मधे. जिथे आम्ही हा शब्द संपेल त्याच्या खाली मालवणी हा शब्द सुरु होयील.
किंमत: २०० रुपये प्रती टि-शर्ट

जे सभासद मुंबईच्या बाहेर रवतात आणि जेन्का टि-शर्ट हव्या आसा त्यांनी कृपया समीर गावडे (मोबा ९८९२३२७५९९) यांच्याशी संपर्क करा.

नाव-नोंदणी करूची अंतिम तारीख 31st october २०११

सहकार्य करा,
धन्यवाद.

Sunday, 2 October 2011

फेसबुक वरची एक बहीण ....

फेसबुक वर अशीच एका मुलीशी ओळख झाली.
आणि त्याने friend request पाठवून तिला add केली.

सकाळी आल्यावर त्याच्या waal वर good morning लिहायची...
काय दादा.. कसो आसस? असा विचारायची..

सकाळ पासून संध्याकाळपर्यंत chat करायची...
संध्याकाळी जाताना.. उद्या भेटू दादा...सांभाळून जा असा बोलायची...

थोड्या दिवसांनी त्याने तिला आपला mobile number दिला...
सुट्टीच्या दिवशी नक्की फोन कर असा बोलला...

का फोन करायला सांगतोस...कॉन्फिर्म काय करणार
fake account नाही आहे...एवढा विश्वास नाही का बहिणीवर....

नाही रे मी... कोणाला फोन करत...फक्त chat करते.
तुला राग येयिल... पण मी खर सांगते...

अशी काहीतरी कारण द्यायची
आणि फोन चा विषय बाजूला करायची

शेवटी एकदा ठरले...
तू phone नाही केलास तर सोमवार पासून नाही बोलायचे ...
दादा बोलतेस ना...मग खोट-खोट नात का जपायचे.....

ठरल्याप्रमाणे तिचा फोन नाही आला....
तिच्या chat ला त्याने reply द्यायचा थांबवला..

एक आठवडा असाच निघून गेला......
शुक्रवारी तिचा message आला...दादा तुला भेटायचय.....

भेटण्याची जागा आणि वेळ message मधे होती...
ठरल्याप्रमाणे ती एका मुलीसोबत आली होती....

त्याने विचारला hii कशी आहेस..फोन का नाही केलास....
मी वाट बघत होतो तुझ्या फोन ची...मला किती दुखावलास....

तिने काहीतरी हाथवारे केले..ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती...
आणि तो स्थब्ध राहून.....त्याची केविलवाणी नजर तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत
होते ...

तिच्या मैत्रिणीने अनुवाद करून सांगितले...
दादा.....तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते रे...पण...
म्हणून आज तुला भेटायला आले....

सचिन आचरेकर