Friday, 30 September 2011

एक विचार...

ओ.... बाबा चला ना लवकर... काय पावला मोजत चाललाय...सांगत होतो नको
येवू...तुम्हाला झेपणार नाहीत तरीपण आलात....देवळातली आरती चालू व्हायची वेळ
झाली.. तुम्ही जर असे चाललात तर पोचायच्या आधी संपून जायील...थोडी पावले उचला
आता.....दोघेही देवळात पोचतात पण आरती अर्धी अधिक संपलेली असते आणि मुलगा
वैतागलेला असतो ...दोघेही घरी येतात....मुलगा चीड चीदेपणाने सगळ्यांशी बोलत
असतो.....बाबा शांतपणे घरात जातात आणि कपाटातून एक डायरी आणून एक पान उघडून
मुलाच्या हातात देतात...मुलगा वाचतो आणि ढसा ढसा रडायला लागतो...

आज पप्पू 2 वर्षाचा झाला आणि नेहमी उचलून घ्या म्हणून सांगणारा पहिल्यांदा
देवळा पर्यंत माझ्या हाताचे बोट पकडून चालत आला...त्यामुळे मला देवाची आरती तर
चुकली पण पप्पूला चालताना पाहून खूप समाधान वाटले म्हणून मी येताना दुकानातून
गुलाबजाम घेवून आलो.

सचिन आचरेकर

Thursday, 29 September 2011

एक किस...

पॉर : तू माझ्यावर किती मनापासून प्रेम करतास रे...आजून तगायात माझ्याकडे एक किस सुद्धा नाय मागलास..
पोरगो: तसा काय नाय गो ...तूझ्या तोंडाक वास येता.... वाईच शिरा मार त्या तोंडावर ....मशेरी लायत जा...

दुसरो दिवस:
पॉर: आज कित्याक नाय घेवक किस?
पोरगो: आज तोंडक तंबाखू चो वास येता हा...
पॉर: (वायतागान...) अरे मी रोज कोलगेट लायतंय, पण तुका कोलगेट चो वास येता..आणि तू माका काल मशेरी लावक संगलास म्हणान आज आजयेची तंबाखू ची मशेरी लावन इलय....
तुझी मेल्या नुसती कारण असतात...तुका काय जमाचा नाय मी दुसरो शोधताय..
सचिन आचरेकर

Wednesday, 21 September 2011

आयुष्य...

Dedicated for all members of Amhi Malvani group on facebook.

चार दिवसांचे आयुष्य हे...
सात जन्मानसारखे जगायचे....
हसत खेळत राहायचे...
का उगाच भांडायचे...??

सकाळी उठून...
फेसबुक वर लोगिन व्हायचे...
आम्ही मालवणीचे पेज उघडून...
गजाली मारायचे...

नवे-जुने, मराठा-भंडारी, मुलगे-मुली
असे भेदभाव नाही करायचे
सगळे मालवणी आपण...
मालवणी म्हणूनच राहायचे

कमेंट आणि पोस्ट करताना....
कोणाचे भावना नाही दुखवायचे....
जर दुखावले गेले तर ..
आपापसात मिटवायचे....

एकच कुटुंब आणि एकच परिवार...
भांडणं करून वेगवेगळ्या चुली नाही थाटायचे...
आपल्या विचारांची देवाण-घेवाण करून
रोज काहीतरी नवीन शिकायचे....

मालवणी भाषा, मालवणी संस्कृती
आणि मालवणी विचार आत्मसात करायचे...
मी मालवणी नाही तर आम्ही मालवणी....
एकमेकंका समजून घ्यायचे....

चार दिवसांचे आयुष्य हे...
सात जन्मानसारखे जगायचे....
सचिन आचरेकर

Monday, 12 September 2011

स्पीचलेस....

होता एक वेडा मुलगा
आत्मविश्वास हरवून बसलेला...
सगळ्या मित्रांचा चेष्टा मस्करीचे साधन होऊन राहिलेला...
...
एखादा मुलगी आणि मुलगा प्रेम करताना तो पाहायचा....
आपल्यासाठी कोणीतरी हवे असे त्यालादेखील वाटायचा...

पण मुली त्याला भाव नाही द्यायचे....
त्यामुळे मुलीनसोबत बोलताना त्याच्या तोंडून शब्द नाही फुटायचे.....

एकदा असच एका सुंदर मुलीने त्याला पत्ता विचारला....
पूर्ण गोंधळलेला तो काहीच नाही सांगू शकला....

कदाचित असावा मुका बाहिरा....
असा गैरसमज झाला त्या मुलीचा....

तिला दया वाटायची अपंग लोकांची.....
करायची मदत जशी तिला जमायची....

ती त्याला डॉक्टर कडे घेऊन गेली...
पण डॉक्टरना काहीच सापडले नाही...

ती त्याची काळजी घेत होती......
त्याला बोलायला यावे म्हणून धडपडत होती.....

तिची माया पाहून त्याच्या मनात प्रेम जागे झाले......
बोलायला येऊनसुद्धा त्याने मुकयाचे नाटक चालूच ठेवले...

अशाच एका अपंग माणसाला ती मदत करत होती...
पण तो माणूस अपंग बनून भीक मागत होता....

त्याचे नाटक बाहेर आल्यावर त्याने तिच्याकडून खूप मार खाल्ला होता.....
त्याच्याजागी या वेड्या मुलाने स्वताहाला पहिले होते...

आपल्याबद्दल खरे समजले तर...ती आपल्याला सोडून जाईल.....
या भीतीने त्याचे मन घाबरले होते......

घाबरलेल्या मनाने वेगळाच निर्णय घेतला......
डॉक्टर कडे जाऊन जीभ कापून घ्यायचा....

डॉक्टरनी तसे करण्यास नकार दिला....
आणि फोन करून तिला याबद्दल माहिती दिली...

आरशासमोर उभा राहून त्याने सगळे शब्द उच्चारले....
आई, बाबा, मित्र....आणि तिचे नावही....

घेतला हातात सुरा...आणि कापून टाकली जीभ....
काय वेडेपणा म्हणावा का ह्याला?....की खरे प्रेम.....

डॉक्टरच्या फोन नुसार ती त्याला भेटायला आली...
आणि म्हणाली...मला तुझ्या तोंडून माझे नाव ऐकायचे आहे....

सचिन आचरेकर
(स्टोरी ऑफ "प्यार दीवाना होता है" ...)

Friday, 9 September 2011

पटेल...

ती त्याला आवडायची पण...
तो विचार कारायचा....ती पटेल का?
...

...
थोड्या दिवसानी ती वाटेत भेटली
आणि म्हणाली....
हे मिस्टर पटेल आणि मी मिसेस पटेल.
सचिन आचरेकर

Tuesday, 6 September 2011

एके दिवशी काय झाले.....

एके दिवशी काय झाले....
मी फसेबूक access केले.....
"Page cannot be displyaed" आले

मला वाटले...
माझे नेट कनेक्षन गेले...
पण इतर साइट नीट चालले....
मला काहीच सुचेनसे झाले...
मन माझे.. सैरा वैरा धावू लागले...

ते AM चे मित्र..
त्या कविता आणि चारोले..
सगळे मालवणी मावळे
कुठेतरी हरवले....

TV वरती न्यूज़ मधे सांगितले
आजपासून फसेबूक बंद झाले...
माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले...

ऑफीस ला जाऊन काय करणार...
वेळ कसा घालवणार....
असे असंख्य प्रश्न मनाला पडू लागले...

आज ऑफीस ला नाही जायचे...
आणि छान पैकी घरी झोप काढायची असे ठरवले...

तेवढ्यात आई आली उठवायला...
7 वाजले ...ऑफीस ला नाही का जायचे तुला...

तेव्हा मला कळले....
मी एक भयानक स्वप्न पहिले.....
तयारी करून ऑफीस मधे येऊन...
पहिले फसेबूक वर लोगिन केले....

सचिन आचरेकर

Monday, 5 September 2011

राणीची बाग...

काल सहजच राणीच्या बागेत जावचा ठरवलव....
कोणीतरी सांगल्याण...बागेत आता राम नाय रवलो....
पण सगळे गणपती बघून थोडीशी विश्रांती घेवक गावातली म्हणून गेलव...

तिकीट कसला...बघण्यासारख्या काय नाय हा असा कोनतरी बोलला....
आतमधे ओळखीचो माणूस रवता...तेका भेटूचा कारण सुचला....

बागेत जाताना खाण्याचे पदार्थ आणि पाण्याचे बातले न्हेवक नाय दिल्यानि....
पशु पक्षांका त्रास देशात... ह्या कारण पुढे केल्यानी...

निरनिराळ्या प्राण्यांचे मोठे मोठे पिंजरे होते....
पण त्याच्यावर "दुरुस्ती साठी पिंजरा बंद आहे" अशे बोर्ड होते....

पिंजर्यांवर पक्षांची आणि प्राण्यांची नावा लिवलेली होती.....
पशु पक्षी गायब होते....आणि त्यांच्या नावांची पाटी पण गंजलेली होती...

पिंजरयाच्या आजु बाजुक चिखल झालेलो....
आपणाक कोण बाघूक येना नाय म्हणून सफेद कावलो पण कालो झालेलो....

पिंजरयात....कृत्रिम गुहा बनवलेली....
पण त्यात कोण असा की नाय... ता... शोधत माणसा भायर उभी रवलेलि....


एका पिंजरयात अस्वल निजलेला दिसला...
लोकानि कितीही उठवल्यानी तरी उठानार नाय असो पण करून बसलेला....

दोन पिंजरात वाघ गुहेमधेच झोपलेले होते...
कदाचित ते पण पिंजारो खाली करूच्या दिशेन प्रवास करीत होते...

दोन गेंड्ये आणि चार मगर एकदम शांत.. पाण्यात विसावलेले...
पोपट आणि लवबर्ड चिव चिव करत स्थिरावलेले....

रिकाम्या पिंजर्याआत कोण वाघ दाखय तर कोण कोल्हो दाखवायचो....
आणखीन चार लोक वाकन बघुक लागले की त्या माणसांचो पोपट व्हायचो....

पुढे गेल्यार एक माकड दिसलो....
१ रुपयाची नाणी पावसाच्या पाण्यात धुवत बसलेलो.....

कदाचित तो ह्याच सांगत होतो.....
तुमचो तिकीटाचो पैसो पाण्यात गेलो.....

सचिन आचरेकर