Thursday, 31 March 2011

एक तृतीयपन्थि ...

एक तृतीयपन्थि ...

एका घरात मुलगो जन्माला इलो..
सगळीकडे गाजावाजा झालो...

मुलचो आवुस आणि बापूस खुश झालो
वंशाचो डिओ उदयाक इलो.

लय दबाजात बारसो झालो..
गोरो गोमतो पोरगो पाळण्यात हसलो.

बापूस म्हणे झीलाक इंजिनियर करतलय...
सगळी संपत्ती नावार करतलय.

सगळे नातेवाईक भरपूर लाड करीत..
येणारे सगळे वाढदिवस साजरे करीत..

वय वाढता वाढता..
तेच्या शरीरात अचानक बदल जावक लागला..
चालणा बोलणा बायका सारख्या वाटाक लागला.

आवाशी बापाशीन डॉक्टराक दाखायल्याण...
डॉक्टराण टेका तृतीयपन्थि ठरायल्याण...

समाज नाव ठेवलतो म्हणान...
आवाशी बापाशीन..एका संस्थेकडे सोपयल्याण..
घर सोडून जाताना तेच्या मनान हम्बरडो फोडल्याण....

संस्थेंन रवाची सोय केल्यानी..
तेच्याच सारखे 4 जोडीदार दिल्यनि..

ट्रॅफिक सिग्नल ही कर्मभूमी झाली.
लोकांकाड्सून इज्जत मिळेणासी झाली.

तेंच्याच समाजात तो जगाक लागलो.
घर आणि नातेवाईक सगळा इसरलो.

असोच एकदा सिग्नलवर अपघात झालो.
अपघातात तो ठार झालो.

तेच्या प्रेताकय कोणी नाय रडल्यानि..
पुढल्या जन्मी असो नको जन्म
म्हणान चप्पल्यानी मारीत पोचायल्यानी..

जगताना छ्क्को होतो म्हणान इज्जत नाय..
आणि मेल्यावर परत छ्क्को नको जन्म म्हणान इज्ज्जत नाय..

ह्या समजाचो अजीब नियम आसा...
ह्या दुनियेत खरोखर...
सगळ्याणका इज्जतिन जगाचा स्वातंत्र्य आसा?

------------- सचिन आचरेकर

नियती...

सकाळी उठल्यापासून तो एप्रिल फूल करी होतो...
आवस, बापूस, आजी, बहीण सगळ्याणका फसय होतो...

आवाशीन रागताच म्हटल्याण..जा मेल्या मर जा..खयतरि..
सतव नकोस माका..
जेवण करूचा रवला हा...दुपार झाली तरी..

मित्रंका एप्रिल फूल करुक बाइक वरसून स्वारी निघाली...
तो मित्रांकडे पोचाच आधीच तेंच्या कानावर बातमी पडली...
कोणीतरी एप्रिल फूल करता हा अशी मनात शंका इली...
गावभर तीच चर्चा सुरू झाली...

आवशी-बापाशिक सांगुची कोणाक हिंमत होय नाय...
कायटरी गावात अघटित घडला हा.. असा तेंका वाटला...

संध्याकाळी पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेली बॉडी घेवन अंमब्यूलेन्स इली...
तेचा तोंड बघून...आवशीच्या हृदयात धडकीच भरली....

एप्रिल फूल असो सत्यात उतरात असा कोणाक वाटलेला नाय...
सकाळी आवाशीन रागन बोललेले शब्द नियतीन खरे करूचे सोडल्यान नाय

---सचिन आचरेकर

Monday, 28 March 2011

सावलीची सोबत...

सावलीची सोबत...

अंधार्‍या रात्री..रस्त्या वरच्या पोलाच्या उजेडात चालत होतो.
रस्त्यावर कोणच नव्हते...पण भीती वाटत नव्हती.
कारण मला माझाच सावलीची सोबत होती.

अर्धा रस्ता काटला होता अर्धा होता बाकी..
मध्येच लाइट गेली आणि मी राहिलो एकाकी.

कारण भारनियमनाला माझ्या सोबतीची खोट होती.

----सचिन आचरेकर

एक निरोप परीक्षा देणार्‍यांका...

एक निरोप परीक्षा देणार्‍यांका...

सगळयांचे परीक्षा चालू झाले.
अभ्यासाच्या नावा खाली सगळे दूर गेले.

आमका तुमची आठवण येतलि.
या नयनात आसवांची साठवण होतलि.

आमचे शुभेच्या आसत तुमच्या पाठी.
तेच्यामुळे परीक्षेची काय नाय भीती.

परीक्षा सरली काय परत येवा.
हयसरच आसा मालवणी मेवा.

---------सचिन आचरेकर

मला तुला आहे भेटायचाय.

मला तुला आहे भेटायचाय...
पण तू कोणालाही नाही सांगायचाय...

चौपाटी वरती जायचाय...
भेळ पुरी खायचाय...

खडकचा मागे जाउन..हळूच तुझ्या मिठीत यायचाय...
सागराचे तुषार अंगावर घ्यायचाय...

इतक्या दिवासातले तुला सांगायचाय...
तुझे बोलणे ऐकून घ्यायचाय..

मागच्या आठविनिया जागे करायचाय...
पुढच्या भेटीसाठी आठवणी ठेवायचाय...

मोबाइल ने तुझ्यासोबत फोटो काढायचाय...
आणि तुझ्या मिठीतच ऑटो ने घरी जायचाय...

-सचिन आचरेकर

तो.....

तो.....

तो आमच्या समोर राहायचा...
सारखा खिडकीतून मला बघायचा...
माझ्यावर प्रेम करायचा....
की नुसताच टाइमपास करायचा...

एक दिवस त्याने मला रस्त्यात गाठले....
माझ्या मनाने पण मानातच हसले.

घरातल्याना दुखवू की त्याला दुखवू.
मला काही कळेनासे झाले..
माझ्या मनाने शेवटी त्यालाच दुखावले..
माझे लग्न ठरलेय असे मी पकवले..

मला सांगायचा...
धुणी, भांडी आणि जेवण...
मी तुझ्यासाठी सगळे काही करीन...
तुला खूप सुखात ठेवीन..

अगदी वेड्या सारखा वागायचा...
दुःखी गाणी लावायचा...
येता जाता मलाच बघत बसायचा...
किती समजवले तरी परत मागे मागे यायचा...

तो खरच वेडा होता...
की..मी त्याला वेडावले होते...

का कोण जाणे आज तो घर सोडून जाताना..
माझ्याही डोळ्यात अश्रू होते.

---सचिन आचरेकर.

होळी स्पेशल....

होळी स्पेशल..

चाकरमान्यानु...
गावकडे जावूया......

साजरी करूया होळी..
खावया आवशीच्या हातची पुराणची पोळी...
चोरूया म्हादग्यॅची शेळई ..
लोकांका घालूया गाळी...

निशानानका पाया पाड्या...
सोंगा घेवाण शबय मागूया..
"आयण्यचा बायना" कानावर घालूया..
जमलेल्या पैशाची भांग आणूया..

शिमग्याचा गोमू बाघूक करूया गर्दी..
हरकत नाय भांग पिवन झाली जरी सर्दि..

होळीक नारळ देवुया..
बालपणिचे आठवणी जागे करूया..

चाकरमान्यानु...
शिमगो करुक गावकडे जावूया..

---------------------------- सचिन आचरेकर