Monday, 1 August 2011

रक्षाबंधन विशेष...

दादा तुका स्वताच्या हातान...
करूचा हा माका रक्षाबंधन...
ये रे दादा...ये रे...लवकर....
येता तुझी खूप खूप आठवण...

गणपती आणि दिवाळी साठी....
तुका होई असता सुट्टी...
एका दिवसासाठी येवचा लागता म्हणान...
तू येनस नाय बांधून घेवक माझी राखी...

दादा मी एकुलती एक बहीण ना तुझी ..
लोक रडतत. ..तेन्का बहीण नाय म्हणून...
थोडेच दिवस मी घरात असतलय...
काय माहीत लगीन झाल्यार खायच्या गावक जातलय...

भावबिजेचा सांगून कारण
राखीशी कशाक रे समझोतो....
भावा बहीनीच्या प्रेमाची..
आठवण म्हणून बांधतत राखिचो रेशमी धागो...

लहान असताना 1 रुपया द्यायचस ओवाळणी.
मी रूसल्यावर सांगायचस....
मोठो झालय काय देईन मोठी ओवाळणी....

माका नको नवीन साडी...
नको तुझी दौलत...
माका फक्त होई आपुलकी आणि तुझी माया थोडी...

ह्या वर्षी मी खूप खुश असाय...
सुट्टीच्या दिवशी आसा रक्षाबंधन...
ये रे दादा...ये रे...लवकर...
वाचत काय बसलास...काढ टिकिट पटकन....

सचिन आचरेकर

No comments:

Post a Comment