गर्भाशायाच्या गुहेमध्ये एक छोटासा जीव हसला....
छोटे छोटे हात पाय पसरून..छोट्या छोट्या ओठानी परत हसला...
विचार करत होती मी बाहेर कधी येयीन..
जिच्यामधे मी रवतय तीका आई कधी म्हनिन..
कधी पाप्पान सोबत आंगणेवाडिक जाईन..
आजोबा सोबत कधी खेळान आजिचे गोष्टी कधी ऐकान
मोठे होवन कधी आईक घरकमात मदत करीन..
आम्ही मालवणी वरती माका भाऊ बहीण गावतीत.
लय भारी पोस्ट करून सगळ्यांचा मन जिंकीन..
मुलगी असलाय म्हणून काय झला..
काम असा करीन माझ्या सिंधुदुर्गचा नाव रोशन करीन.
पण.....पण......पण.....
ह्या काय ऐकून माझा छोटासा हृदय थारथारक लागला..
आई चा काळीज कसा कठोर झाला...पप्पानका कसाच काय नाय वाटला..
माझ्या आयुष्याचा फूल फुलाचाच आधी बावला...
माझ्या "कधी" चा अनपेक्षित अंत झला..
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्याचा विचार करा..
आणि १००० पुरुषांचा मागे १००० महिला होय द्या.
--सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment