हॉटेल मधे..
लांबसडक केसांची..
गोरी गोरी छान
मुलगी बसली होती...
चोरून चोरून
माझ्याकडे एकटक
बघून मला नजरेने
घायाळ करत होती
सुंदर रसाल
लालभडक ओठ
थोडेसेच
उघड बंद करत होती...
टपोरी डोळे
मिचकावत होती
गालातल्या गालात
हसत होती...
माझे नशीब
आज खुलले.
मला वाटले...
ती इशारा करत होती...
मी माझ्या
टेबल वरुन उठून..
तिच्या टेबल कडे गेलो.
आणि हलकच हसून उभा राहिलो.
तेवढ्यात तिने...
कानातला हेड फोन काढला..
आणि मला म्हणाली...
एक कप कॉफी प्लीज़...
सचिन आचरेकर
Tuesday, 30 August 2011
Monday, 29 August 2011
प्रणय...
थंड-गार पावसामधे
बेधुन्द होऊनि न्हावे...
तू माझ्या जवळ यावे
आणि मला मिठीत घ्यावे...
सोज्वळ तुझे तन..
माझ्या स्पर्शाने गरम व्हावे...
डोल्यातील शब्द कळावे....
लज्जेचे बंध गळावे....
श्वास श्वासातून मिसळून जावे...
थंडाव्या तही उबदार वाटावे....
मिटून डोळे..तृप्त न्हावे
तनामनात तूच भिनावे...
स्वर्गसुख अनुभवताना...
सगळ्या जगाला विसरूनी जावे...
हा पावसाळा कधीच न थांबावे....
पावसामुळे ऑफीस बंद रहावे....
तू निघून जाता सकाळी
'नको ना जाऊ' असे रूसावे....
पुन्हा एकदा उराशि तुला कवटाळावे...
आणि तू आठवणींचे चुंबन उशशी ठेवून जावे...
सचिन आचरेकर
बेधुन्द होऊनि न्हावे...
तू माझ्या जवळ यावे
आणि मला मिठीत घ्यावे...
सोज्वळ तुझे तन..
माझ्या स्पर्शाने गरम व्हावे...
डोल्यातील शब्द कळावे....
लज्जेचे बंध गळावे....
श्वास श्वासातून मिसळून जावे...
थंडाव्या तही उबदार वाटावे....
मिटून डोळे..तृप्त न्हावे
तनामनात तूच भिनावे...
स्वर्गसुख अनुभवताना...
सगळ्या जगाला विसरूनी जावे...
हा पावसाळा कधीच न थांबावे....
पावसामुळे ऑफीस बंद रहावे....
तू निघून जाता सकाळी
'नको ना जाऊ' असे रूसावे....
पुन्हा एकदा उराशि तुला कवटाळावे...
आणि तू आठवणींचे चुंबन उशशी ठेवून जावे...
सचिन आचरेकर
Tuesday, 23 August 2011
flirt...
आवाशीन सांगल्यान .
मेल्या २८ वर्षचो झालास
आता घरात सून हाड....
मीया facebook वर लोगिन केलय
धडाधड मुलींका रिक्वेस्ट पाठवलय..
हाय हेलो केलाय...
आणि पटकन लग्नाचा इचारालाय....
सगळिकडून नकार गावलो ही गोष्ट सोडाच....
पण लग्नाबद्दल विचारणा ह्यो काय गुन्हो आसा काय....?
आता सांगा माझा काय चुकाला...?
टाइमपास तर करुक नाय....
सगळीकडे गाजावाजा झालो...
आणि माझ्यासाराखो एक साधो माणूस flirt ठरलो.
सचिन आचरेकर
मेल्या २८ वर्षचो झालास
आता घरात सून हाड....
मीया facebook वर लोगिन केलय
धडाधड मुलींका रिक्वेस्ट पाठवलय..
हाय हेलो केलाय...
आणि पटकन लग्नाचा इचारालाय....
सगळिकडून नकार गावलो ही गोष्ट सोडाच....
पण लग्नाबद्दल विचारणा ह्यो काय गुन्हो आसा काय....?
आता सांगा माझा काय चुकाला...?
टाइमपास तर करुक नाय....
सगळीकडे गाजावाजा झालो...
आणि माझ्यासाराखो एक साधो माणूस flirt ठरलो.
सचिन आचरेकर
Monday, 22 August 2011
चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...
जनलोकपाल बिलासाठी अण्णाना पाठिंबा देवुया...
भ्रष्टाचाराची दही-हांडी फोडूया...
चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...
लाच घेणे हेच्यापेक्षा लाच देणे ह्यो गुन्हो असा...
दुसर्याक दोष देवच्या आधी सुरूवात स्वताहा पासून करूया...
कालो पैसो भारतात आणूक धरणा करूया....
वाढलेली महागाई कमी करूया
चला पुन्हा एकदा भारत-देश स्वतंत्र करूया...
अहिंसेची लढाई लढूया....
गोरयांच्य़ा हातातसून देश सोडावल्यानी ...
आता काळ्यांच्या हातातसून मुक्त करूया...
लोकशाही म्हणजे काय... ता दाखवून देवुया....
चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...
सचिन आचरेकर
Friday, 5 August 2011
छत्री...
तिची छत्री वादळात मोडली होती...
वाटले तिला आपल्या छत्रीत घ्यावे....
पण घेण्याची हिंमत नाही झाली...
कारण माझ्याही छत्रीला भोके होती....
मी तेच्याकडे बघत होताय...
कदाचित ता माझ्या छत्रीचो आधार घेयत...
पण ता पावसात भिजतच रवला...
दुसर्यदिवशी तपान फडफडला......
ताप इलो म्हणान डॉक्टराकडे गेला...
डॉक्टरकडे सांगल्यान झालो नेमोनिया...
माझ्या छत्रीत इला असता...
तर सर्दि वर निभावला असता.....
वाटले तिला आपल्या छत्रीत घ्यावे....
पण घेण्याची हिंमत नाही झाली...
कारण माझ्याही छत्रीला भोके होती....
मी तेच्याकडे बघत होताय...
कदाचित ता माझ्या छत्रीचो आधार घेयत...
पण ता पावसात भिजतच रवला...
दुसर्यदिवशी तपान फडफडला......
ताप इलो म्हणान डॉक्टराकडे गेला...
डॉक्टरकडे सांगल्यान झालो नेमोनिया...
माझ्या छत्रीत इला असता...
तर सर्दि वर निभावला असता.....
तुझी भेट ...
आज लागे मज
आस तुझ्या भेटीची...
मजसाठी एक दिस
सोड कामे शेतीची....
शपथ आहे तुज
तुझ्या माझ्या प्रीतीची...
घेऊ नको धास्ती
तुझ्या म्हातार्या बापाची...
भागवू एकमेकास पाहुनी
तहान आसुसलेल्या नयनांची...
ये ना समजून काढाया
माझ्या वेड्या मनाची...
तुझी भेट.....भेट
मज मैत्रीच्या सणाची ...
वाट बघटेय मन..
तू भेटायला येण्याची.....
by सचिन आचरेकर
आस तुझ्या भेटीची...
मजसाठी एक दिस
सोड कामे शेतीची....
शपथ आहे तुज
तुझ्या माझ्या प्रीतीची...
घेऊ नको धास्ती
तुझ्या म्हातार्या बापाची...
भागवू एकमेकास पाहुनी
तहान आसुसलेल्या नयनांची...
ये ना समजून काढाया
माझ्या वेड्या मनाची...
तुझी भेट.....भेट
मज मैत्रीच्या सणाची ...
वाट बघटेय मन..
तू भेटायला येण्याची.....
by सचिन आचरेकर
Monday, 1 August 2011
गिरणी कामगार विशेष...
ओ गाववाल्यानु ऐकलास काय?
मी मुंबईतलो गिरणी कामगार..
गेली २९ वर्षा झगाडतय...
मिल बंद पडले...आणि गावाची वाट धरलय...
म्हटला.. गावकडे भाव बांधकी बरोबर...करीन शेती...
चार पैशे कामावन रवान सुखी...
भावाक वाटला ह्यो हिस्सो मगाक इलो...
तो पण अनोलख्या सर्खो वागाक लागलो...
एका घराचो येगळेचार केल्यान....
भावा-भावाचा नाता तोडल्यान....
माझ्यावाटयाक कमी हिस्सो दिल्याण...
वागीच भांडाणा नको म्हणान माझ्या मनं शांत रवल्याण...
जेव्हा कामक होतय...तेवा माका पत्रा धाडायचो...
दादा कधी यतलास... असा पत्रात लिवायचो....
माका रजा नाय...काम भरपूर आसा...
असा पत्रात लिवताना गावाची खूप आठवणी येयचो..
पण आता काय रवला नाय...
माझ्या हातात ४ पैशे नाय म्हणान कोण माका इचारणा नाय....
खूप केलव् आंदोलना आणि मोर्चे...
तेच्यावर राजकारण्यांनी मिळवलयानी खुर्चे...
आजुनय माझ्या पदरात काय पडाक नाय...
सत्ता मिळावक "मराठी माणूस" पण सोडलयानी नाय...
आता म्हणे... कामगरांका घरा देतले....
काय माहीत....? काय परत.....?
त्याच मुद्द्यावर राजकारण खेळतले??
सचिन आचरेकर
मी मुंबईतलो गिरणी कामगार..
गेली २९ वर्षा झगाडतय...
मिल बंद पडले...आणि गावाची वाट धरलय...
म्हटला.. गावकडे भाव बांधकी बरोबर...करीन शेती...
चार पैशे कामावन रवान सुखी...
भावाक वाटला ह्यो हिस्सो मगाक इलो...
तो पण अनोलख्या सर्खो वागाक लागलो...
एका घराचो येगळेचार केल्यान....
भावा-भावाचा नाता तोडल्यान....
माझ्यावाटयाक कमी हिस्सो दिल्याण...
वागीच भांडाणा नको म्हणान माझ्या मनं शांत रवल्याण...
जेव्हा कामक होतय...तेवा माका पत्रा धाडायचो...
दादा कधी यतलास... असा पत्रात लिवायचो....
माका रजा नाय...काम भरपूर आसा...
असा पत्रात लिवताना गावाची खूप आठवणी येयचो..
पण आता काय रवला नाय...
माझ्या हातात ४ पैशे नाय म्हणान कोण माका इचारणा नाय....
खूप केलव् आंदोलना आणि मोर्चे...
तेच्यावर राजकारण्यांनी मिळवलयानी खुर्चे...
आजुनय माझ्या पदरात काय पडाक नाय...
सत्ता मिळावक "मराठी माणूस" पण सोडलयानी नाय...
आता म्हणे... कामगरांका घरा देतले....
काय माहीत....? काय परत.....?
त्याच मुद्द्यावर राजकारण खेळतले??
सचिन आचरेकर
Subscribe to:
Posts (Atom)