Friday, 14 June 2013

आंबोलीचो घाट

सिंधुदुर्गातला थंड हवेचा ठिकाण…
सह्याद्रीच्या कुशीत लपलेलो आंबोलीचो घाट…

हिरव्यागार झुडपात आणि पांढऱ्या शुभ्र धुक्यात…
आंबोलीक जावची काय मज्जाच निराळी…
दुपारच्या जेवणात चिकनचो रस्सो आणि आंबोळी…

रस्त्यावरच गावता धबधबो मोठो….
धबधब्यात उताराचा म्हणजे अंगार येता काटो….

हिरण्यकेशी कडे जावक बरा वाटता…
पण जळू चिकटात तर भय दिसता….

एक धबधबो आसा खास…
पण पानयात जावक नाय शकनास….
पानयाच्या आवाजान दुमदुमता … नांगरतास….

पाणी खालसुन वर व्हावता….
खाली फेकलेला बाटलेचा बुच परत वर येता…
जर नाय बघालास कावळेसात…
तर कसलो फिरलास आंबोली घाट ?

सचिन आचरेकर
(14-06-13)

Tuesday, 6 November 2012

पहाटेचा शृंगार...

सोडून गेली ती लग्नाचा देवून नकार...
म्हणते... कसा करू तुझा मी विचार...
तुझ्या आयुष्यात फक्त नी फक्त अंधार...
वेडीला कोण समजावणार.....
हा नाही काळोखा अंधार...
तर आहे पहाटेचा शृंगार .
तुझ्या स्वार्थी पणाचा नकोय मलाच आधार....
सचिन आचरेकर

Sunday, 28 October 2012

चिवल्याची येळ


तीनसानची कातर येळ...
समुद्रात डूबनारो खिन्न सूर्य...
माडाच्या झावळ्यात सून दडान बघनारो चंद्र...
रुपेरी वाळूवर चांदण्यांचो मंद प्रकाश...
ओहोटीच्या लाटांचो सौम्य आवाज...
ता आणि मी चीवल्याच्या येळेर...
हातात हात...आणि थंडगार वारो...
सगळाच रोमांचक...
पण एवढ्यात बाईक ने येणारे २ मित्र ..
हातातलो हात भयन सुटता...
आणि धावपळ....
मित्रांची नजर आपल्याकडे....
आपली मित्रांकडे...
पण  चेहऱ्यावर अनोळखी भाव...
अर्ध्या तासान मित्रांचो फोन...
ह्या आता नवीन कोण?
नवीन नाय..
मुंबईक जावन सुधारला...
अरेय ह्या ता जुनाच....
मधल्या वाडीतला शकला...
सचिन आचरेकर

Thursday, 11 October 2012

माका वाटला भंकस करता


माका वाटला भंकस करता...ह्या मूळ कवितेच्या कवीची माफी मागून...:):):):)

माका वाटला भंकस करता...
येताना जाताना वाटेत गावता...
गालातल्या गालात हसता...

माका वाटला भंकस करता...
मित्राकडे माझी चौकशी करता...
माझ्या वांगडा बोलाक लाजता...

माका वाटला भंकस करता...
फेसबुक वर पोस्ट आणि कॉमेंट लायिक करता
पण request नाय धाडना ...

माका वाटला भंकस करता...
कोण gf हा काय इचारता
'आजून कोण पटाक नाय' असा बोलता ...

माका वाटला भंकस करता...
मित्र बोललो... मेल्या भंकस नाय ता तुझ्यार मरता...
इतक्या वगीच काय कोण कोणासाठी झुरता

माका वाटला भंकस करता...
खरा खोटा बघुच्यासाठी माझ्या लाग्नाचो फतवो केल्यान...
ता ऐकान ता रडला.....
तेव्हा माका कळला...
ह्या प्वार माझ्या प्रेमात पडला

सचिन आचरेकर
 

Tuesday, 25 September 2012

माझो गणपती बाप्पा...

माझो गणपती बाप्पा...
लय लय महान ..
सुपासारखे कान....
हाता एवढा लांब नाक..
तरी दिसता कसा छान...

एका हातात मोदक...
एक हात करून वर ..
देता माका आशीर्वाद...
भला मोठा पोट  ...
आवस दाखयता पोटभर नेवेद....

पिवळा पिवळा धोतर...
पोटावर तेच्या नाग....
माझो गणपती बाप्पा
माझ्याकडे बघता ..
करून सरळ मान...

डोक्यार मुकुट
गळ्यात सोन्याचे साखळे...
फुलांची आरास आणि चांदीच्या सोफ्यार
झालो हा बाप्पा माझो विराजमान....

वर्षातसून ५ दिवस येता....
घर कसा भरान येता...
बाप्पा मुळे माझो काका..
वर्षातसून एकदातरी माका गमता...

रोज गोड धोड खावक गावता....
चातुर्थेक काका नवीन कपडे हाडता...
शाळेक ८ दिवस रजा पडता....
बाप्पा मुळे घरात दोन येळा आरत होता...

५ दिवस कधी सरतात...
कधीच नाय कळनत...
बाप्पाक पोचवताना....
डोळ्यातसून दुखा येतत....

आजी समजूत घालता...
बाबा... ४ दिसाचो पावनो तो...
पुढल्या वर्साक परत येतलो...
४ दिवस रवतलो...
आणि परत आपल्या गावाक जातलो...

ह्या ऐकान....
तोंडातसून शब्द येतत...
गणपती बाप्पा मोरया...
पुढच्या वर्षी लवकर या...
गणपती गेले गावाला...
चैन पडेना आम्हाला....

सचिन आचरेकर
२५/०९/१२

Tuesday, 24 July 2012

वात्सल्य

कोण म्हणत.... मी अनाथ आहे?
समाजाच्या रुपात माझे अनेक नाथ आहेत...
आई बाबांचे वात्सल्य माझ्या नशिबात नसेल...
थोडा वेळ मिळालेले तुमचे प्रेम सुद्धा माझ्यासाठी खूप आहे...

आई बाबांनी मला आपल्यापासून दूर केले.
त्यांना मी नकोशी होते का?
इथे येणारे बोलतात किती गोंडस बाळ आहे..
माझ्या आई बाबांना गोंडसपणा दिसला नाही का?

मी एक मुलगी म्हणून जन्माला आले...
माझा खर्च परवडणारा नव्हता...
कि आई बाबांना माझ्यामुळे त्रास होता...
काहीतरी नक्कीच असेल कारण...
नाहीतर.... आपल्या पोटच्या गोळ्याला कोणी सोडेल का विनाकारण?

कोणीतरी मला कचरा कुंडीतून उचलून पोलिसांना दिल...
पोलिसांनी "वात्सल्य" कडे सोपवून नवीन घर दिल...
माझे लहान मोठे भाऊ-बहिण माझ्यासोबत खेळतात...
संस्थेत येणारे लोक मला उचलून घेतात...
येताना माझ्यासाठी खावू आणतात.
माझ्यासोबत थोडा वेळ घालवतात.

थोड्याच दिवसात मला नवीन आई बाबा मिळतील..
मला आपल्या घरी घेवून जातील..
जरी पहिल्या आई बाबांनी टाकून दिल
नवीन आई बाबा मला स्वीकारतील...
माझ हरवलेलं वात्सल्य मला परत देतील...
सचिन आचरेकर

Wednesday, 9 May 2012

"कोकणचो राजा"

वसंतात कडक न्हीम्बार पडला... आणि अम्ब्याक मोहोर कमी लागलो... माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो येप्रीलात कधी नाय तो पावस पडलो... लागलेलो मोहोर गळान गेलो.... माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो. पर्यटन जिल्ह्यात नको तो प्रकल्प इलो.... निसर्गाच्या नियमात बदल झालो... इकास नाय झालो तरी...कोकण चो कॅलिफोर्निया झालो.... माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो... जाणकार सांगतत ...यंदा आंबो उसरा येतलो... आंबो तयार जायसार....पावस पडतलो.... पावस पडान गेल्यार अम्ब्याक कोण इचारतलो... माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो. शिजन सरत इलो..... तरी कोकणी माणसान आजून आंबो नाय उष्टावलो... इलेलो आंबो यंदा कोकणी माणसाकच नाय पुरतलो.... माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो.... ह्या निसर्गाचा चक्र असाच चालू रवला... तर मासेमारी पाठोपाठ "कोकणचो राजा" हद्दपार होतलो... ग्लोबल कोकण ची स्वप्ना बघताना... ग्लोबल वार्मिंग चो इचार करुक होयो... नायतर माका वाटता "कोकणचो राजा" कायमच दुष्काळात गावतलो.... सचिन आचरेकर

मालवणी माणूस बदाललो....

मालवणी माणूस बदाललो.... मागे रवान पुढे जाणार्याचे पाय ओढ्नारो मालवणी माणूस बदाललो.... दुसऱ्यान केल्यान काय स्वतः करुक धावता... आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता... दुसर्याच्या बरोबरीन जावाचा सोडून... आपापसातच स्पर्धा निर्माण करता.... आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता... स्पर्धेतसून होतात मारामारे आणि भांडणा.... "मालवणी माणूस कधी सुधाराचो नाय..." असा लोकांका बोलाक गावता.... आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता... सचिन आचरेकर

Tuesday, 8 May 2012

"शुभेछा पत्र"

एका अनाथ मुलीच्या मनातले भाव टिपुचो प्रयत्न...आजच्या "मातृ दिनी" मला ना ठाव... माझी कोण ग आय... अन कोण माझा बा... माझो परिवार...म्हंजे "अनाथालय " आय च्या आणि बा च्या परेमान... झालाय माझो जनम... फेकून दिले मला....कारण... झाला नव्हता तेंचा लगन... पोलिसांना म्या गावली... त्यांनी हिकडं मला आणली... तवापासून... म्या हिकडच वाढली... सगळे दिस आम्ही बी साजरे करतोया... मातृ दिनाच्या आणि पितृ दिनाच्या... "शुभेछा पत्र" रस्त्यावर इकतोया... -- सचिन आचरेकर

Monday, 12 March 2012

Charoli

खूप त्रास होतो ओल्या पापणीला
तुला दूर जाताना पाहताना...
तुला विसरायचे म्हणून...
मनाच्या विरोधी वागताना...
:(
सचिन आचरेकर

Jokes

अमित कानसेन customer care ला फोने केल्यान...
अमित कानसे: hello मी कानसे बोल रहा हून...
customer care अधिकारी: क्या मजाक कर राहे हो? कान से कोई बोल सकता है क्या?
आणि phone जोरात आपटून ठेवन दिल्यान :)
सचिन आचरेकर
sorry अमित just for TP राग नसावा :)

एक मुलगो एका मुलीचे सगळे commets like करत असता...
मुलगी: तुला माझ्या सगळ्याच comments आवडतात का रे?
मुलागो: हो ग comments काय...तू पण आवडतेस.
मुलगी: हो दादा..... thanks
मुलागो: नाही ग त्या comments एवढ्या फालतू आहेत म्हणून त्या कॉम्मेंत खाली unlike बघावसं वाटतंय.
:प
सचिन आचरेकर

Thursday, 2 February 2012

लफडा

हातात नांगर घेवन कुणग्यान कुणगो नंगार्ल्यान...
खिल्लारी बैलाच्या जोडीन बरी साथ दिल्यान...
सगळा कर्ज फेडूचा सपान तेनी बघितल्यान...
तरावो लावच्या येळाक पावसान दडी मारल्यान...
कोण सांगता मानसाच लफडी करतत...
निसर्गान सुद्धा माणसांका मागे टाकल्यान....
सचिन आचरेकर

Tuesday, 3 January 2012

मराठी भाषा

माझ्या भावाक एका कंपनी मधून क्रेडीट कार्ड साठी फोने इलेलो...सामोरचो माणूस हिंदीतसून बोला होतो...माझो भाव बोललो कि मराठीत बोल मका हिंदी कळत नाय...तो माणूस मराठीतसून बोललो आणि आड नावावार्सून तेनी विचारल्यान कि "सर... तुमचा गाव कोणता? माझ्या भावान मालवण म्हणून संगल्यावर ...दोघायाले मालवणीत बोलक लागले....तो माणूस सिंधुदुर्गातलोच होतो...तेका भावान विचारल्यान....तू मराठी माणूस मग हिंदीत सून कित्याक बोलतस.....तर तो बोललो कि अमका ट्रेनिंग असाच दिलेला हा....मित्रानु....आपल्या गावाकडच्या मुलांका/मुलींका भाषेच्या condition मुळे नोकरी मिळताना प्रोब्लेम्स होतत.... आणि किमान प्रत्येकान जे फोन calls येतत त्यांच्या सोबत जर मराठी बोलालाव तर मराठी भाषा बोलणाऱ्या साठी नक्कीच नोकरे उपलब्ध होतले...आणि नोकर्यांसाठी कसलच राजकारण सुद्धा होवचा नाय....
सचिन आचरेकर

Friday, 30 December 2011

मुलगी आणि तिचे समाजातील स्थान

आज आपण मुलगी आणि तिचे समाजातील स्थान या विषयावर चर्चा करूया...असा कुठेतरी वाचला कि भारता मध्ये दर वर्षी १० लाख नव जात बालिकेची हत्या केली जाते आणि म्हणून आपल्या देशात लिंग निदान चाचणी ला सरकारने बंदी घातली आहे...आज फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर स्त्री पुरुष प्रमाण १०००/९२६ असा आहे. उत्तरेकडील एका राज्यात..जर लग्न करायचे असेल तर मुलीला विकत आणावे लागते....अगदी सुरुवातीपासून मुलींबद्दल समाजाने द्वेषाची भूमिका का ठेवली आहे तेच काळात नाही...मुलीना शाळेत नाही पाठवायचे....पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रयत्नाने सध्या मुलीना शिक्षण उपलब्ध आहे. पण मुलगी चे अति शिक्षण हेच तिच्या घाताचे ठरतेय....लग्न जमवताना हाच विचार केला जातो कि मुली चे शिक्षण आणि income हे मुलापेक्षा कमी आहे का? ..काय गरज आहे याची? संसार थाटताना दोघांचाही तेवढाच हाथभार असतो..मग हा विचार का केला जातो....जर बायको जास्त शिकलेली आणि जास्त कमावणारी असेल तर त्याचा अभिमान बाळगावा...

मी जेव्हा दुसरी-तिसरी ला होतो तेव्हा पुस्तकातले धडे अशेच होते..."गोपाळ शाळेत जा....लीला पाणी आण"...इथूनच जर भेदभाव शिकवत गेलो तर पुढे तेच विचार विकसित होत जातात...मुली सुद्धा याला जबाबदार आहेत....स्त्री-पुरुष समानता असताना का हवंय "स्त्रियांसाठी आरक्षण"... ते आरक्षण मागता म्हणजे तुम्ही दुसर्या भाषेत अजूनही कमकुवत आहात असा दाखवून देता.....माझ्या बर्याच मैत्रिणींकडून मी असा ऐकलय कि...लग्न झाल्यावर मला माझा नवरा जसा वागवेल तसा वागेन....मला समाजात नाही...लग्न करणे म्हणजे तुरुंगात जाने किवा एखाद्याची दासी बनून राहणे असे आहे का? मला एवढेच सांगायचे आहे कि....आत्मसन्मान बाळगा....स्वतःला कमी लेखू नका....आणि मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे त्यामुळे तुमची मागणी वाढलेली आहे....योग्य असा जीवनसाथी निवडण्याचा तुमचा अधिकार आहे. मुलगा एका घराचे नव रोषण करतो तर मुली ला दोन घरांचे नाव रोषण करता येते. ते रोषण करायचे कि मान खाली घालवायला लावायची हे मुलीनु तुम्हीच ठरवा...

लग्न झाल्यावर जेव्हा मुलगा होत नाही तेव्हा स्त्रीला वांझोटी असा बोलून हिणवले जाते ...नवर्याच्या घरी काही अघटीत घडले तर पांढऱ्या पायाची अवदसा असा बोलला जात.... मुलगी जन्माला आली तरी स्त्री ला जबाबदार धरले जाते .पण science सांगते कि मुलगा किवा मुलगी होणे हे फक्त आणि फक्त पुरुषावर अवलंबून असते...स्त्री ने घरातील सर्व काम करून, मुलांना सांभाळून जॉब सुद्धा करावा ....किती अपेक्षा.....केवळ एक मुलगी आहे म्हणून.....तुमच्या घरात लग्न होवून आलेली मुलगी हि लक्ष्मि चे रूप असते...तिला दुखी ठेवून सुख मिळणार नाही....आणि केवळ विश्वासाच्या नात्याने आपल्या आई- पप्पा, मित्र-मैत्रिणी , भावू-बहिण सगळ्यांना सोडून आलेली असते....तिला समजून घेतले गेले पाहिजे...

राजा राम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती ची अनिष्ट प्रथा बंद झाली...महात्मा फुले यांच्या सहकार्याने समाजाने विधवा पुअर्विवाह मान्य केला...परंतु....जेव्हा तिच्या नवऱ्याचा देह अंत्यविधी साठी नेत असतात तेव्हा स्त्रियांच्या अंगावरील दागिने ज्या पद्धतीने काढले जातात , कपाळावरील कुंकू जबरदस्तीने पुसले जाते....हाताला काच लागेपर्यंत हातातील बांगड्या फोडल्या जातात.....आणि हे सर्व १०० -२०० पुरुषांच्या समोर होत असते....एक विचार करा...त्या स्त्री ला काय वाटत असेल...दुक्खातून सावरलेली पण नसेल ती आणि केवळ रूढी आणि परंपरा जपण्यासाठी अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे....मी काही आगरकर यांच्यासारखा समाज सुधारक नाही..पण हि घाणेरडी प्रथा बंद व्हावी असा मनापासून वाटत....दागिने/कुंकू हे घरामध्ये कोणत्यातरी महिलेच्या हातून काढले जावेत....

सचिन आचरेकर

Thursday, 29 December 2011

मैत्री

मैत्री टाइमपास म्हणून करायची नसते किवा कोणीतरी कंपनी हवी म्हणून करायची नसते.....
दोन माणसे एकमेकाला भेटतात..बोलणे होते..विचार जूळतात..सहवास वाढतो आणि मैत्री होते.
मुलगा आणि मुलगी ची मैत्री असेल तर ती एक चर्चेचा विषय बनते...
पण मैत्री मधे गरज असते ती एकमेकांवरचा विश्वासाची, एकदुसर्‍याचा भावनांची.
मैत्री मधे एकमेकाचा सुखाचा साथीदार आणि दुखचा भागीदार वायचे असते..
मित्राने प्रामाणिक पाने दिलेले कॉमेंट्स आत्मसात करून आयुषात पुढे जायचे असते.
ब्लडग्रूप ओ + असला तरी लाइफ मधे बी+ राहायचे असते.
मित्रावरती रागवायचे असते पण थोड्या वेळाने परत एक वायचे असते..
कारण मैत्रीचे हे नाते कधीच टाइमपास नसते..ते आयुष्यभर जपायचे असते.

Monday, 19 December 2011

सोशल नेटवर्किंग

सध्या सोशल नेटवर्किंगचा विळखा तरुण पिढी ला लागलेला दिसतो. या विलख्यामध्ये
गुंतणारे जास्तीत जास्त मेम्बर्स हे १८ ते २५ या वयोगटातील असल्याचे आढळून
येते. लोकांना आपल्या आयुष्य पेक्षा दुसर्यांच्या आयुष्यात काय चालला आहे
याचीच जास्त चिंता असते आणि म्हणूनच फेसबुक सारख सोशल नेटवर्किंग ची वेबसाईट
अमेरिकेपेक्षा भारतात जास्त प्रसिद्ध होते कारण अमेरिके सारख्या देशात सोशल
लाइफ फार कमी आहे. सोशल साईट चा वापर चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करता येतो.
पण सध्याची पिढी एक मुलगी पटवण्याचे साधन म्हणून "फेसबुक" कडे बघतात. chatting
च्या रूपाने flirting चालू होते. आज या मुलीला तर उद्या त्या मुलीला "I Love u
" बोलले कि झाला propose , किती सोप्प आहे ना .... माझा प्रेमाला विरोध नाही
पण केवळ timepass म्हणून एखाद्याच्या भावनांशी खेळणे किती योग्य आहे? काही जण
seriously लग्नाचा विचार करून relationship ला सुरुवात करतात....पण हा विचार
करताना ज्या आई वडिलांनी आपणास जन्म दिला त्यांच्या अपेक्षा काय
आहेत...त्यांना हे आवडेल का? नाही आवडलं तर काय होणार याचा सुद्धा विचार करणे
गरजेचे आहे. Online chat मध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती ओळखता? कि फक्त
chat वर विचार जुळतात असा विचार करणे कि त्याच्या आवडी-निवडी जाणून न घेता
प्रेमात पडणे योग्य आहे?. असे म्हणतात कि प्रेम आंधळे असते त्यामुळे समोरील
व्यक्तीच्या गुणधरमानकडे दुर्लक्ष होतो...आणि लग्न झाल्यावर जेव्हा सहवास
वाढतो तेव्हा नेमके तेच गुणधर्म आडवे येतात...त्यामध्ये तुमचे relation किती
वेळ टिकू शकेल...याचा विचार करणे गरजेचे आहे. काही मुली फक्त गोड बोलून
मुलांचा लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि propose केल्यावर ignore
करायला सुरुवात करतात.. आपल्यामागे किती मुलगे लागले आहेत ते दर्शवून त्यांना
आपण ग्रेट असल्याचे वाटते पण medical science मध्ये त्याला psychological
disorder समजले जाते.
कमी वयात प्रेम केल्यामुळे तुमच्या carrier वरती परिणाम होवू शकतो आणि
भावनेच्या भरात आयुष्यातील मोठी चुकू होवून कौमार्य गमवून बसू शकता. Medical
science च्या दृष्टीने विचार केला तर या वयामध्ये शरीरामध्ये काही बदल होत
असतात..त्यालाच वयात येणे असे बोलले जाते आणि शरीरात स्त्रवणाऱ्या काही
Harmones मुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागते त्यामुळे तुमच्या मनावर
तुम्ही किती कंट्रोल करू शकता याची पण एक कसोटीच असते. maturity यायला थोडा
वेळ लागतो आणि जेव्हा mature व्हाल तेव्हा योग्य ती व्यक्ती तुमच्या
आयुष्यामध्ये नक्कीच येयील.
हा एक साधारण लेख आहे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाण्याचा प्रश्न नाही.
कोणीही वयक्तिक आपल्यावरती अ लेख ओढवून घेवू नये हि विनंती.
सचिन आचरेकर

Sunday, 18 December 2011

सोशल नेटवर्किंग वेबसाईटस - नाती

सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस मुळे बऱ्याच नवीन ओळखी होत आहेत. त्यामध्ये
काही ग्रुप्स बनत आहेत आणि त्या ग्रुप मध्ये वयातील अंतरामुळे दादा - ताई किवा
काका - मावशी अशी नाती बनत आहेत. सध्याच्या professional जीवनामध्ये खरच अशी
नाती बनवणे योग्य आहे का? कि फक्त मैत्रीचे नाते ठीक आहे? कारण अशा
नात्यांमुळे एक भावनिक ओढ निर्माण होते. मोबाईल, chat , SMS च्या माध्यमातून
संपर्क वाढतो आणि हीच नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
त्यातूनच आपल्या सख्या नात्यांकडे दुर्लक्ष सुद्धा होवू शकतो. या नात्यांमुळे
अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही कि मन दुखावते. रोजच्या
बोलण्याने एक सवय जडून जाते आणि एक दिवस बोलणं नाही झाला तर कुठे मन रमत नाही.
नाती बनवताना आपण हे विसरून जातो कि समोरची व्यक्ती आपल नात किती seriously
घेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला काका किवा मावशी बोलत असाल तर खरोखरच समोरच्या
व्यक्तीला ते नात आवडत का ? कि आवडत नसेल...समोरच्या व्यक्तीला आवडत असेल तर
ठीक आहे पण ती व्यक्ती या नात्याच्या जाहिरातीने दुखावली तर जात नाही
ना....जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी बहिण - भावाच नात जपतात तेव्हा ते नात
पुढे जावून डोईजड होवू शकते कारण आपली बहिण कुठेच चुकू नये अस प्रत्येक भावाला
वाटत असत... जर ती मुलगी कोणाच्या प्रेमात पडली तर ते कदाचित एक भाऊ या
नात्याने तुम्हाला समजणे जड जावू शकते. मुलीनी एक विचार केलेला असतो कि जेव्हा
लग्न होयील तेव्हा सासरचा नात जपायचं...त्यामुळे जेव्हा अशा बहिणीचा लग्न
होणार तेव्हा या नात्याचा सुद्धा अंत होवू शकतो कारण त्या मुलीच पुढील आयुष्य
हे सासरच्या माणसांवर अवलंबून असत आणि त्यासाठी प्रत्येक मुलीची तयारी
असते...त्यामुळे हा विचार मनात ठेवून जर तुम्ही एखाद्या मुलीला बहिण समजत असाल
तर ठीक आहे नाहीतर जर तुमचे मन sensitive असेल तर मैत्रीचे नात जोडणं हेच
चांगले अस मला वाटत..

कृपया हा लेख कोणीही वैयक्तिक घेवू नका....या लेखाचा आणि कोणत्याही व्यक्तीचा
प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष संबंध नाही आहे.
सचिन आचरेकर

Tuesday, 6 December 2011

माझं घर

एक एक वीट रचुनी घर मी बांधिले...
कुठून आले वादळ कुणास ठावूक...
एवढे मोठे घर कोसळताना मी पहिले...
कसा सावरू मी स्वतःला..हेच मला कळेनासे झाले..


विस्कटलेली एक एक वीट शोधतोय...
पण नवीन रचलेली वीट कोसळतेय...
विटा मजबूत रचायला कुठे कमी पडतोय...
हेच मला कळेनासे झालेय...

मला वाटत त्रुटी त्या विटांमध्ये नाही.
त्रुटी माझ्या कर्तव्यात राहिली...
तुटलेले घर बांधायला मी का कमी पडतोय..
हेच मला कळेनासे झालेय...

जुन्या विटा लवकरच सापडतील
नवीन विटाना साथ देतील..
आपले घर परत उभे राहील...
अगदी पाहिल्यासारखे....

सचिन आचरेकर

तुझा विरह...

फेसबुक वर तिची ओळख झाली
तिचा ऑफिसमधला रिकामा वेळ ती माझ्याशी chat करून घालवू लागली..
मी मात्र वेड्यासारखा माझं काम बाजूला ठेवून तिच्याशी गप्पा मारायला लागलो..
कधी reply नाही दिला तर बोलायची....तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही....
आणि सारखं piing करत रहायची...
मला वाटायचे ...माझी किती काळजी करते...माझ्यासाठी online येते..

बोलता बोलता..तिच्यावर मन कधी जडले कळलच नाही..
एकदा ती मला म्हणाली...मला एक मुलगा आवडतो...सांग मी काय करू?...
तो मुलगा मी नसणारच हे मनाला माहित होत...
असंख्य विचार मनामध्ये घोळू लागले..
ना कामात लक्ष ना जेवणावर....
ना कोणाशी बोलावेसे वाटत होते...
कोणी online बोलायला आले तर busy आहे अस सांगून शांत बसायचो..
विचार केला...एकदा मनातले सांगून मोकळे व्हायचे...
पण मनातला ऐकून ती मैत्री तर नाही तोडणार ना....
आणि ती नाही बोलली तर माझं दिवस कसा जायील...
असंख्य विचार.....आणि मनाची कासावीस..
पण एकदा तिला सांगूनच टाकले...
अपेक्षेप्रमाणे तिचा नकार आला.....
आता ती मला ignore करतेय...
माझ्याशी बोलणे म्हणजे डोकेदुखी झालीय...
पण मला तिच्यासोबत बोलल्याशिवाय चैन पडत नाही...
ती बोलली..असा कसा विचार करू शकतेस तू...मला फक्त मित्र हवाय...
मी बोललो तुला मित्र हवाय मग आयुष्य भारासाठी का नको...
ती म्हणे सगळ्यांशीच चांगली बोलते आणि सगळेच तिच्या प्रेमात पडतात....
पण असा का वागते...कि ज्याच्यामुळे एखाद्याला सवय होते..इतक्या जवळ का जाते?
कि दूर जाताना त्रास देवून जाते...
मी शांत आहे समजून घेयीन...पण..
माझ्यासारखा एखादा प्रेमवेडा असेल तो कदाचित आपले आयुष्य संपवेल...
तुझ्या विरहाने......

सचिन आचरेकर
06/12/2011